शिंदे-फडणवीस, अजितदादांच्या भेटीनंतर शिवतारेंची तलवार बोथट, आज वाद मिटण्याची शक्यता
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
विजय शिवतारे यांनी रात्री उशिरा शिंदे-फडणवीस आणि अजित पवारांची भेट घेतली. देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी पुष्पगुच्छ देऊन शिवतारेंसोबत फोटो घेतला. शिवतारेंचे हावभाव वाद मिटला असल्याचा इशारा करत होते पण त्यांनी माध्यमांशी बोलणं टाळलं. दरम्यान विजय शिवतारे आज पत्रकार परिषद घेऊन वादावर भाष्य करण्याची शक्यता आहे. या चर्चेला शिवसेनेचे आमदार भरत गोगावले देखील उपस्थित होते.