बारामतीच्या भावी खासदार म्हणून सुनेत्रा पवार यांचे बॅनर, नणंद भावजय भिडणार असल्याच्या चर्चांना उधाण
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट पडले. त्यानंतर अजित पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघावर दावा सांगितला. अजित पवार गटाच्या ईशान्य मुंबई जिल्हा निरीक्षक प्रतीक्षा घुगे यांनी मंत्रालय परिसरात बॅनर लावले आहेत.या बॅनरवर सुनेत्रा पवार यांचा उल्लेख बारामती लोकसभा भावी खासदार असा केला आहे. त्यामुळे बारामतीत नणंद भावजय सामना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.