मद्य धोरणातील कथित भ्रष्टाचारामुळे केजरीवाल अडचणीतमद्य धोरणातील कथित भ्रष्टाचारामुळे आम आदमी पक्षाच्या अडचणी काही संपायला तयार नाहीत. आता आपचे सर्वेसर्वा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही इडीचं बोलावणं आलंय. २ नोव्हेंबर ला केजरीवालांना चौकशीला हजर राहण्याबाबात नोटीस आलीय. मात्र ही नोटीस राजकीय हेतुने पाठवल्याचं सांगत अरविंद केजरीवालांनी चौकशीला न जाण्याचा निर्णय घेतलाय. फेब्रुवारी २०२३ मध्ये दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदियांना अटक झाली होती. त्यानंतरही या प्रकरणात केंद्रीय तपास यंत्रणांकडून आम आदमी पक्षाच्या अनेक नेत्यांची चौकशी करण्यात आली होती. मागील महिन्यात कथित मद्य धोरण घोटाळ्यात आपचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांना अटक झाली होती.. मनिष सिसोदिया आणि संजय सिंह यांच्या अटकेनंतर केजरीवालांमागे चौकशीचा ससमेमीरा लागला आहे.. मात्र चार राज्यांच्या निवडणूक प्रचाराला जाण्यापासून रोखण्यासाठी नोटीस पाठवल्याचा आरोप केजरीवालांनी केलाय.