१६ कोटी २५ लाखांची बोली लावून संघात घेतलं, तोच स्टोक्स CSK ला पडला महागात !आयपीएलच्या १६ व्या हंगामासाठी इंग्लडच्या टेस्ट टीमचा कॅप्टन असणाऱ्या बेन स्टोक्सला धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जनं तब्बल १६ कोटी २५ लाख रुपये देऊन आपल्या ताफ्यात घेतलं. आयपीएल लिलावा दरम्यान लखनौ सुपर जायटंस् ला टक्कर देत बेन स्टोक्सला चेन्नई आपल्या संघात घेतलं. आणि हाच बेन स्टोक्स चेन्नईला चांगलाच महागात पडलाय.चेन्नई सुपर किंग्ज संघाचा शेवटचा साखळी सामना 20 मे रोजी दिल्ली कॅपिटल्सकडून होणार आहे. CSK चा अष्टपैलू बेन स्टोक्स पूर्णपणे तंदुरुस्त नसल्यामुळे शेवटच्या लीग सामन्यानंतर मायदेशी परतणार आहे. म्हणजेच स्टोक्स सीएसकेच्या प्लेऑफ सामन्यांमध्ये उपस्थित राहणार नाहीये. १६ जून पासून सुरु होणाऱ्या अॅशेस मालिकेसाठी स्टॉक्स रवाना होणार आहे.बेन स्टोक्सने या मोसमात फक्त दोनच सामने खेळले आहेत. त्या दोन्ही सामन्यांमध्ये तो बॉल आणि बॅट या दोन्ही बाबतीत फ्लॉप दिसला. तेव्हापासून तो दुखापतीमुळे बेंचवर बसला आहे. या दोन सामन्यांमध्ये बेन स्टोक्सने सात आणि आठ रन केले. तर एका ओव्हरमध्ये १८ रन दिले. याचा विचार करता बेन स्टोक्सचा एक रन चेन्नई १ कोटींपेक्षाही महागात पडलाय.