तान्हं बाळं रडू नये म्हणून तोंडाला चिकटपट्टी लावली; महापालिकेच्या रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
1209 views
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब कराभांडुपमधील मुंबई महानगरपालिकेच्या सावित्रीबाई फुले प्रसूतीगृहातील हा धक्कादायक प्रकार. जन्मलेलं तान्हं बाळ रडू नये म्हणून बाळाच्या तोंडाला चिकटपट्टी लावल्याचा घृणास्पद प्रकार समोर आलाय. प्रसूतीगृहात काम करणाऱ्या परिचारिकांकडूनच हा प्रकार केला जात असल्याचे उघडकीस आलंय. या रुग्णालयात काही दिवसांपूर्वी प्रिया कांबळे नावाच्या महिलेची प्रसूती झाली होती. बाळाला कावीळ झाली असल्यानं त्याला एन आय सी युमध्ये ठेवण्यात आलं होतं. बाळाला पाहण्यासाठी म्हणून जेव्हा त्या गेल्या तेव्हा एनआयसी युनिटमध्ये गेल्या त्यावेळी त्यांच्या बाळाच्या तोंडामध्ये चोखणी देऊन त्याचं तोंड चिकटपट्टीने बंद करण्यात आहलं होतं. हा प्रकार पाहताच त्यांना धक्का बसला. या संदर्भात तिथल्या परिचारिकांना विचारलं असता तिच्या बोलण्यावरून हे तिथे नेहमीच आणि सहजतेनं होतं असल्याचं स्पष्ट झालं.