भरत गोगावले पायऱ्यांवर आले, वैभव नाईक हात सोडेनात अन् अंबादास दानवेंच्या घोषणा थांबेनात
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
राज्याच्या विधीमंडळ पावसाळी अधिवेशनाचा आज (१८ जुलै) दुसरा दिवस आहे. यावेळी, सत्ताधारी शिंदे गटातील आमदार भरत गोगावलेंना विधानसभेत प्रवेश करताना ठाकरे गटाच्या आमदार वैभव नाईकांनी पायऱ्यांवर अडवून ठेवलं. एकीकडे वैभव नाईकांनी अडवलं तर दुसरीकडे अंबादास दानवेंनी नाॅनस्टाॅप घोषणा सुरु ठेवल्या. अखेर कसा तरी हात सोडवत गोगावले हे नाईक अन् दानवेंच्या तावडीतून सुटले अन् सभागृहाकडे निघाले.