व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने फिरवणं खोडसाळपणा, त्यावेळी नेमकी काय चर्चा झाली?, मुख्यमंत्र्यांनी थेट सांगितलं!
1528 views
mumbai चे व्हिडिओ सबस्क्राईब करामराठा आरक्षणासंदर्भात असलेल्या पत्रकार परिषदेतला मुख्यमंत्र्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवर स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केलं आहे. ते म्हणाले, मी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री पत्रकार परिषदेसाठी आलो. यावेळी आम्ही एकमेकांशी बोलत होतो. आपल्यात मराठा आरक्षणाबाबात जी सकारात्मक चर्चा झाली त्यावरच आपण बोलूयात, असं मी म्हणालो. या व्यतिरिक्त राजकीय गोष्टींवर प्रतिक्रिया नको. जास्त प्रश्नोत्तर नको, अशा प्रकारची आमची चर्चा चालू होती. शासनाने इतकी चांगली भूमिका घेतली असतांना मुद्दामहून काही विरोधक खोडसाळपणा करत आहेत. व्हिडिओ क्लिप चुकीच्या पद्धतीने संपादित करुन लोकांच्या मनात गैरसमज पसरवण्याचं काम करीत आहेत. हे अतिशय निंदनीय आहे. असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी म्हटलं आहे.