Former Maharashtra CM Manohar Joshi Death : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री डॉ. मनोहर जोशी यांचे निधन
1227 views
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब करामाजी मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते मनोहर जोशी यांचे आज पहाटे निधन झालं. काही दिवसांपासून मनोहर जोशी यांच्यावर हिंदुजा रुग्णालयात उपचार करण्यात येत होते. परंतु आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील काही काळापासून प्रकृतीच्या कारणास्तव मनोहर जोशी सक्रीय राजकारणापासून दूर होते. जोशी यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी माटुंगा पश्चिम, रुपारेल कॉलेज जवळील W54 या त्यांच्या सध्या निवासस्थानी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळात ठेवण्यात येणार आहे. दुपारी २ नंतर अंत्ययात्रा सुरू होईल. माजी मुख्यमंत्री, माजी लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशींवर दादर स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होतील. मागील वर्षी मनोहर जोशी यांनी मोठ्या आजारावर जिद्दीने मात केली होती.