डोक्यावर फेटा, आधी राजेंना नमन मग राजांचं दर्शन, संभाजीराजे छत्रपती गणपती बाप्पांच्या चरणी लीन!
माजी खासदार छत्रपती संभाजीराजे आज मुंबई दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी मुंबईतील गिरगावच्या राजाचं प्रथमदर्शन घेतलं. यावेळी छत्रपती संभाजीराजे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, पर्यावरण पूरक गणपती मूर्तींचा इतरांनीही आदर्श घ्यावा. ज्या भागाला इतिहास आहे त्यांनी आदर्श ठेवला तर नक्कीच बदल होईल. येथील सजावटीसाठी छत्रपती शिवरायांच्या विचारांची जोड दिल्याने मी मंडळाचे कौतुक करतो. यावेळी त्यांनी लालबाग मंडळाकडून सजावट केलेल्या शिवरायांच्या राजमुद्रेवरही भाष्य केलं.
Curated by Vishranti Shinde|TimesXP Maharashtra|17 Sept 2023