पोलोचे खेळाडू कधीतरी बाहेर येऊन बोलतात, राज ठाकरेंची दादागिरी चालणार नाही; सदावर्तेंचा निशाणा!
1256 views
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब करामनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ९ ऑक्टोबरला पत्रकार परिषद घेतली.टोल संदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर मनसैनिकांनी पनवेल, वाशी व मुलुंड टोल नाक्यावर आंदोलन केली.काही चार चाकी वाहनांना मनसे कार्यकर्त्यांनी टोल न भरता सोडण्यात आलं.यामुळे राज ठाकरेंविरोधात वकील सदावर्ते पोलिसांत तक्रार दाखल करण्यासाठी पोहोचले.राज ठाकरेंना अटक करण्याची मागणी यावेळी गुणरत्न सदावर्तेंनी केली आहे.ते म्हणाले, 'हिंदू राष्ट्र भारत हमारा' असं मानणारं आमचं संघटन आहे.मराठी, गुजराती, तमिळ, तेलुगू सगळ्यांसाठी महाराष्ट्र-मुंबई एकत्र नांदण्यासाठी आहे.पोलोचे खेळाडू कधीतरी बाहेर येऊन बोलतात.महाराष्ट्रात अशी हिंसा आणि राज ठाकरेंची दादागिरी चालवून घेणार नाही.डंके की चोट पे सांगत आहोत… काही झालं तर राज ठाकरेच जबाबदार आहेत.