झारखंड झुकेगा नहीं.. शिवाजी पार्कवरून हेमंत सोरेन यांच्या पत्नीचं भाजपला थेट आव्हान
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
शिवाजी पार्कवर राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेची समारोप सभा पार पडली. या समारोप सभेत झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या पत्नीने दमदार भाषण केलं. झारखंड झुकेगा नही म्हणत कल्पना सोरेन यांनी थेट भाजपला आव्हान दिलं. हेमंत सोरेन सध्या जेलमध्ये आहेत. कल्पना सोरेन त्यांच्या पतीचा संदेश घेऊन शिवाजी पार्कवर आल्या होत्या. पतीला जेलमध्ये टाकलं असलं तरी दबावाला बळी पडणार नसल्याचा थेट इशारा त्यांनी दिला.