मी महायुतीतच होतो, जागेचा तिढा सुटत नव्हता म्हणून इकडे तिकडे होतो | महादेव जानकर
1032 views
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब करामुंबई येथे महायुतीची लोकसभेच्या जागा वाटपासंदर्भात बैठक पार पडली.या बैठकीला राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी हजेरी लावली.मी महायुतीसोबत असून माझ्या पक्षाला एक जागा देण्यात आल्याचं जानकरांनी सांगितलं.नेमकी लोकसभा कुठून लढवणार हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.छोट्या पक्षांना भाजप संपवतं अशी टीका यापूर्वी जानकरांनी केली होती.जागेचा तिढा सुटत नव्हता म्हणून इकडे तिकडे होतो असं जानकर म्हणाले.