मराठा क्रांती मोर्चाकडून धडक मोर्चा, CM यांच्या वर्षा बंगल्याकडे कूच, पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं!
1109 views
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब करामराठा समाज आरक्षणासाठी पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. एकीकडे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र दौरा सुरु केलाय. तर दुसरीकडे मुंबईत आज मराठा क्रांती मोर्चाकडून धडक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. गिरगाव चौपाटीवरुन शहीद तुकाराम ओंबळे यांच्या स्मारकाला वंदन करुन या मोर्चाला सुरुवात झाली होती. हा मोर्चा थेट मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्याच्या दिशेनं कूच करणार होता. गिरगाव चौपाटी ते वर्षा बंगला दरम्यानचा परिसर सायलेंट झोन असल्याने पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली होती. मात्र, आंदोलकांसोबतच्या चर्चेनंतर पोलिसांनी मोर्चासाठी परवानगी दिली. आंदोलकांनी मोर्चा सुरूही केला. पण विविंग डेक परिसरात मोर्चा आल्यानंतर पोलिसांनी मराठा आंदोलकांना ताब्यात घेतलं. यावेळी मराठी क्रांती मोर्चाचे समन्वयक सुनील नागणे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.