मुंबईत वसतिगृहात तरुणीचा मृतदेह सापडला, संशयित आरोपीनं स्वतःच जीवनही संपवलं
1195 views
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब करामरीन ड्राइव्ह येथे सावित्रीबाई फुले वसतिगृह असून देशभरातून मुंबईत शिकण्यासाठी येणाऱ्या तरुणींना राहण्यासाठी या वसतिगृहात व्यवस्था आहे. पॉलिटेक्निकलमध्ये शिकणारी अकोल्याची ही तरुणी गेल्या काही दिवसांपासून या वसतिगृहात राहत होती. चौथ्या मजल्यावर वास्तव्यास असलेली ही तरुणी मंगळवारी सकाळपासून खोलीबाहेर न आल्याने इतर तरुणी तिच्या खोलीजवळ गेल्या. त्यानंतर धक्कादायक प्रकार समोर आला.