महापरिनिर्वाणदिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सांगितिक आदरांजली
1230 views
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब करा६ डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी 'भीमांजली' हा कार्यक्रम आयोजित केला जातो.यंदा भीमांजली या कार्यक्रमाचं आठवं वर्ष आहे.शास्त्रीय संगीताच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली अर्पण करण्यात येते.डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समिती व तालविहार संगीत संस्थेच्या वतीनं हा कार्यक्रम करण्यात येतो.६ डिसेंबर रोजी शिवाजी मंदिर, दादर येथे सकाळी ६ वाजता हा कार्यक्रम पार पडणार आहे.सर्व रसिक श्रोत्यांना भीमांजली या कार्यक्रमाला विनामूल्य हजेरी लावता येणार आहे.