कार्यकर्त्यांने आधी विनंती केली, मग आक्रमक होताच पवारांकडे पाहत स्वतःला घेतलं मारून
1278 views
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब कराशरद पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर सभागृहात घोषीत केल्यानंतर शरद पवारांच्या निर्णयाला कार्यकर्त्यांनी विरोध केला. निर्णय मागे घेईपर्यंत सभागृह सोडणार नाही, असा आग्रह कार्यकर्त्यांनी केला आहे. यावेळी समोर बसलेला एक कार्यकर्ता अचानक उठून उभा राहिला. राजीनामा मागे घ्या, नाहीतर मी आणि माझं कुटुंब जीव देईल, असं म्हणाला. पवारांकडे पाहत स्वतःला मारत असलेल्या या कार्यकर्त्याचा व्हिडिओ चर्चेत आलाय.