महाविकास आघाडीचं जागावाटप झालं, आमच्या बरोबर वंचितही असेल, संजय राऊतांनी क्लिअरकट सांगितलं
1067 views
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब करालोकसभा निवडणूक लढण्यासाठी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची गुरूवारी बैठक पार पडली.महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं अतिशय व्यवस्थित आणि सुखरूपपणे जागावाटप पार पडलं.अशी माहिती शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.सर्व ४८ जागांवर महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची अतिशय छान चर्चा झाली.येत्या ३० तारखेला पुन्हा आम्ही चर्चेसाठी एकत्र बसतोय, त्यावेळी आमच्या बरोबर वंचितही असेल,असंही राऊत यांनी सांगितलं. सकाळी ११ वाजता सुरू झालेली बैठक सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरू होती.तब्बल सात झालेल्या बैठकीत राज्यातील सर्व ४८ जागांवर चर्चा होऊन जागावाटप सुखरूप पद्धतीने पार पडली.