विजय शिवतारे अन् अजित पवार आमने-सामने, वर्षावर खलबतं; मध्यरात्री काय घडलं? संजय शिरसाटांनी सांगितलं
1037 views
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब करालोकसभेच्या तोंडावर महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारीवरून राजकारण तापलं आहे. यामध्ये अनेक विद्यमान खासदारांची तिकीटं कापली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे तिकीट कापण्याच्या भीतीने नाराजांची फौज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी दाखल झाली. या बैठकीला राज्याचे मुख्यमंत्री शिंदे, उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, विजय शिवतारे उदय सामंत, दादा भुसे, संजय राठोड, आनंदराव अडसूळ, भावना गवळी आणि नाशिकचे खासदार हेमंत गोडसे, आमदार संजय शिरसाट हे उपस्थित आहेत. माध्यमांना प्रतिक्रिया देताना संजय शिरसाटांनी शिवतारेंना युतीधर्म पाळण्याचा सल्ला दिला आहे. बारामती लोकसभेवरून भिडलेले अजितदादा आणि शिवतारे बैठकीच्या निमित्ताने एकत्र आले. यावेळी, शिवतारेंनी नाराजी बाजूला ठेऊन युतीधर्म पाळावा अशी अपेक्षा शिरसाटांनी व्यक्त केली.