तुम्ही हट्टी तर मी डबल हट्टी; निर्णयासाठी २ दिवस द्या; शरद पवारांचा कार्यकर्त्यांसाठी अजितदादांकडे निरोप
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
शरद पवारांनी आज (२ मे) राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्तीची घोषणा केली आहे. लोक माझे सांगाती या आपल्या राजकीय आत्मकथनाच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात. ..शरद पवारांनी ही घोषणा करत सर्वांनाच राजकीय धक्का दिला आहे. त्यानंतर, कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत शरद पवारांना तातडीने निर्णय मागे घेण्याची विनंती केली. आक्रमक कार्यकर्त्यांना अजितदादांनी समजवण्याचा प्रयत्न केला, शरद पवारांचा निरोप सांगितला. मला निर्णयासाठी २ दिवस द्या, कार्यकर्त्यांनी आता खाऊन-पिऊन गावाला निघावं....असं निरोपही शरद पवारांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. मात्र, जर कार्यकर्त्यांनी हट्टीपणा सोडला नाहीतर मी सुद्धा डबल हट्टी असल्याचं पवारांनी सांगितलं.