ठाकरे गटाचा तडकाफडकी राजीनामा देणाऱ्या शिल्पा बोडखेंचा शिवसेनेत प्रवेश, उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप!
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पूर्व विदर्भ महिला आघाडी संपर्क प्रमुख आणि पक्षाच्या प्रवक्त्या...शिल्पा बोडखे यांनी काही दिवसांपूर्वी पक्षातील महिला नेतृत्त्वांवर आरोप करत पक्षाचा राजीनामा दिला.पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला आहे.सतत षडयंत्र रचून वारंवार संघटन विस्कळीत करण्याचा प्रयत्न केल्याचं त्या यावेळी म्हणाल्या.मी पक्षाचे अहोरात्र प्रामाणिकपणे काम करत राहिले आणि विशाखा राऊत आणि रंजना नेवाळकर...या शिवसेना भवनात बसून षडयंत्र रचत बसल्या, असेही आरोप त्यांनी यावेळी केले आहेत.