CM Shinde यांना दणका, Shivsena पदाधिकाऱ्यांचा Raj Thackeray यांच्या उपस्थितीत MNS मध्ये जाहीर प्रवेश
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मनसेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेला धक्का दिलाय.भिवंडी लोकसभा मतदारसंघातील शिंदे गटामधील पदाधिकाऱ्यांनी मनसेत पक्षप्रवेश केला आहे.शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत मनसेचा झेंडा हाती धरला आहे.शिवसेना शिंदे गटाचे भिवंडी लोकसभेचे उपजिल्हाप्रमुख संतोष शिंदे यांच्या नेतृत्वाखाली...भिवंडी लोकसभा मतदारसंघातील शहर प्रमुख, महिला आघाडी, तालुका प्रमुख महिला आघाडीआणि शहापूर मधील इतर शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा मनसेत पक्षप्रवेश झाला आहे.या प्रवेशामुळे शिवसेना-भाजप महायुतीला भिवंडीत मोठा हादरा बसण्याची शक्यता आहे.मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश पार पडला आहे.यावेळी मनसेचे नेते बाळा नांदगावकर, अविनाश जाधव, उपाध्यक्ष श्री. डी के म्हात्रे उपस्थित होते.सध्या भिवंडीतून भाजपचे खासदार असलेले कपिल पाटील हे केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री आहेत.तर भिवंडी लोकसभेमध्ये नुकत्याच राष्ट्रवादीत गेलेल्या बाळ्या मामांना मानणारा मोठा वर्ग आहे.त्यांची ताकदही या मतदारसंघात आहे. त्यामुळे आता महायुतीची डोकेदुखी वाढण्याची चिन्हं आहेत.