अजितदादा सत्तेत नको हे भाजपच्या कोणत्या नेत्याला पत्र लिहून सांगणार? अंधारेंचा फडणवीसांना थेट सवाल
1268 views
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब कराराष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांनी अजित पवारांना पाठिंबा दिल्यानंतर...उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीत त्यांचा समावेश करून घेण्यास विरोध केला आहे.यावर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.त्या म्हणाल्या, नवाब मलिक यांच्यावर आरोप असल्याने ते महायुतीत नको, अशी भूमिका फडणवीस यांनी घेतली.पण त्याचवेळी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी अर्थात सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी...अजित पवार यांच्यावर ७० हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले होते.मग त्यावेळी सत्तेपेक्षा देश मोठा हे तत्वज्ञान तुम्हाला का सुचले नाही?त्यांचा पाठिंबा घेताना तुमची नैतिकता कुठे गेली होती? असा सवाल त्यांनी विचारला आहे.