राज ठाकरेंना समर्थन दिलं, देवेंद्र फडणवीसांना सवाल केला; तेजस्विनी पंडितच्या अडचणी वाढल्या
1704 views
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब करातेजस्विनी पंडितने देवेंद्र फडणवीसांचा टोलबद्दल बोलतानाचा एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये ते म्हणत होते,"शिवसेना-भाजपाची युती असताना आम्ही जी घोषणा तेव्हा केली होती त्यानुसार आता राज्यातील सगळ्या टोलवर आम्ही छोट्या गाड्यांना टोल मुक्ती दिली आहे. महाराष्ट्रात आपण केवळ कमर्शियल-मोठ्या गाड्यांचे टोल घेतो". तेजस्विनीने व्हिडीओ शेअर करत लिहिलं होतं,"म्हणजे? यांना कळतंय ना नेमकं हे काय बोलतायत ?? मग इतके वर्ष आम्ही जो टोल भरतो आहोत तो कुणाच्या खिशात जातोय?राजसाहेब तुम्हीच आता काय ते करा, महाराष्ट्राला वाचवा या टोल धाडीतून".