दादर स्थानकाचे नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर करा, सचिन खरात यांची मुख्यमंत्री शिंदेंकडे मागणी
1059 views
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब कराआज राज्यामध्ये राज्य मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काही रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याबाबत प्रस्तावावर चर्चा होणार आहे. परंतु दादर येथे संविधाननिर्माता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान, महापरिनिर्वाणभूमी आणि कर्मभूमी आहे.याचमुळे महाराष्ट्र राज्यामध्ये गेल्या कित्येक वर्षापासून आंबेडकरी समाज दादर रेल्वे स्थानकाचे नाव...डॉ. बाबासाहेब आंबेडकर रेल्वे स्थानक करण्यात यावी अशी मागणी करत आहे.ही आंबेडकरी समाजाची भावना समजून घेऊन राज्याचे माननीय मुख्यमंत्री शिंदे यांनी...दादर रेल्वे स्थानकाचे नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर रेल्वे स्थानक करावे ही विनंती.अशी मागणी सचिन खरात राष्ट्रीय अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सचिन खरात गट) यांनी केलीये.