देशातील सर्वात मोठ्या सागरी मार्गाचे काम युद्धपातळीवर, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडून पाहणी!
1057 views
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब करादेशातील सर्वात मोठा सागरी मार्ग ठरणाऱ्या (22 कि.मी. लांबी) शिवडी ते न्हावा शेवामुंबई ट्रान्सहार्बर लिंकचे काम सध्या युद्धपातळीवर सुरु आहे.आज मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी केली.मुंबई पारबंदर प्रकल्पातील २१.८१ किमी लांबीच्या सागरी सेतूचे बांधकाम पूर्ण झाले आहे.त्यामुळे या सेतूवरून आता मालवाहतूक करणारी वाहने, बांधकाम साहित्याची ने-आण करणे शक्य होणार आहे.प्रकल्पाच्या दुसऱ्या पॅकेजचा शेवटचा ऑर्थोट्रॉपिक स्टील डेक यशस्वीरित्या उभारण्यात आला आहे.हा स्पॅन १३६ मीटर लांब असून १३७६ मॅट्रिक टन वजनाचा आहे.पॅकेज २ मध्ये ६५ मी ते १८० मी चे ३२ स्पॅन उभारण्यात येणार होते, ज्यांची उभारणी आता पूर्ण झाली आहे.तर प्रकल्पातील अन्य दोन टप्प्यांची कामेही ९३ टक्के पूर्ण झाली आहेत.प्रामुख्याने मुंबई- शिवडी-चिर्ले भाग जोडला गेला आहे.या वाहतुकीमुळे आता उर्वरित टप्प्यातील कामे वेगाने पूर्ण होतील.