तुमची लाट आहे म्हणता तर लोकसभेची निवडणूक बॅलेट पेपरवर घेऊन दाखवा, ठाकरेंचं भाजपला थेट चॅलेंज
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
शिवसेना ठाकरे गटाच्या मंत्रालय परिसरातील शिवालय कार्यालयाचं उद्घाटन पार पडलं.या कार्यक्रमानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकारांशी संवाद साधला.चार राज्यात निवडणुका पार पडल्या ज्यात तीन राज्यात भाजपला यश मिळालं.भाजपची लाट आहे म्हणणाऱ्यांनी आधी मुंबई महापालिकेची निवडणूक घ्यावी असं ठाकरे म्हणाले.हिंमत असेल तर लोकसभेची निवडणूक बॅलेट पेपरवर घेऊन दाखवा असं आव्हान ठाकरेंनी दिलं आहे.