लवाद जर सुप्रीम कोर्टाला जुमानत नसेल तर..., नार्वेकरांचं नाव न घेता ठाकरेंनी झोडलं!
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
शिवाजी पार्क मैदानात ठाकरे गटाचा दसरा मेळावा पार पडतोय.यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना संबोधित केलं.यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राहुल नार्वेकर यांचं नाव न घेता निशाणा साधला.अजूनही यांचं वेळापत्रक ठरत नाही, मी कुणाचा अपमान करु इच्छित नाही, असंही ठाकरे म्हणाले.अपात्रतेचा निर्णय ५० वर्षांनी लावा, पण संपूर्ण जग केवळ अपात्रतेच्या निर्णयाकडे पाहत नाही.तर सर्वोच्च न्यायालयाचे अस्तित्व राहणार की नाही, याकडे लक्ष असल्याचं ठाकरे यावेळी म्हणाले.केसचा निकाल लागण्यापूर्वी निवडणुका जाहीर करा, जनता ठरवेल खरी शिवसेना कोण? असंही ठाकरे म्हणाले.