ठाकरेंकडून धाकट्या लेकाला राजकीय शिष्टाचाराचं ट्रेनिंग, पाहुण्यांचं स्वागत करताना खाणाखुणा
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव मुंबई दौऱ्यावर होते. या दौ-यात नितीश कुमार आणि तेजस्वी यादव मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांचं शाल देऊन स्वागत केलं. तर पुष्पगुच्छ देऊन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नितीश कुमार यांचं स्वागत केलं. यावेळी तेजस्वी यादव यांच्या स्वागतासाठी उद्धव ठाकरे आदित्यला इशारा करताना दिसले. मागे उभ्या असलेल्या तेजस ठाकरे यांना पुढे येण्यासाठी खाणाखुणा करताना पाहायला मिळाले. अशातच तेजस ठाकरे यांनी तेजस्वी यादव यांचं शाल देऊन स्वागत केलं. यावेळी ठाकरेंनी हाताने नमस्कार करुन दाखवत तेजसला नमस्कार करण्यासाठी इशारा देखील केला. ठाकरेंकडून धाकट्या लेकाला राजकीय शिष्टाचाराचं ट्रेनिंग देतानाच ठाकरे पाहायला मिळाले. तेजस ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या या व्हिडिओची सध्या चर्चा सुरु आहे. भाजपा विरोधात विरोधकांची एकत्र मोट बांधण्याचे काम सध्या नितीश कुमार करत आहेत.