राजेश टोपेंशी फोनवर बोलणं झालं नाही, शिवीगाळ करणाऱ्या व्हायरल ऑडिओ क्लिपनंतर लोणीकरांचं स्पष्टीकरण
1118 views
नागपूर चे व्हिडिओ सबस्क्राईब कराजालना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीवरून बबनराव लोणीकर आणि माजी मंत्री राजेश टोपे यांच्यात वाद झाल्याचे पाहायला मिळाले होते.भाजप आमदार बबनराव लोणीकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश टोपे यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.आमदार एकमेकांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत असल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली.ही ऑडिओ क्लिप माझी नाही असं मत बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केलं आहे.राजेश टोपेंशी फोनवर बोलणं झालं नाही असंही लोणीकर यावेळी म्हणाले.