१८००० किलो वजनाची हनुमान कढई, प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला बनणार ७००० किलो महाप्रसाद
नागपूर चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठेला अवघे काही दिवस उरले आहेत. या सोहळ्यासाठी देशभरातून भेटवस्तू पाठवण्यात येत आहेत. महाराष्ट्राची उपराजधानी नागपुरातूनही रामलल्लासाठी खास भेटवस्तू पाठवली जात आहे. जगप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी प्रभु श्री राम यांचा प्रसाद बनवण्यासाठी 1800 किलो वजनाचा आणि 10 फूट रुंद हनुमान कढई नागपुरातून पाठवत आहे. या कढईत एकाच वेळी 7000 किलो शिरा बनवून भाविकांमध्ये वाटला जाणार आहे. त्याकरीता जगातील सर्वात मोठी ‘हनुमान’ कढई तयार करण्यात आली आहे. ही कढई विष्णू मनोहर अयोध्येतील श्रीराम मंदिराला अर्पण करणार आहेत.