आधी आभार, मग नागपुरी भाषेत औकात शब्दांचा अर्थ सांगत फडणवीसांची राहुल गांधींवर सडकून टीका
1034 views
नागपूर चे व्हिडिओ सबस्क्राईब कराआज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर दौऱ्यावर होते.'मृत्युंजयाचा आत्मयज्ञ' या स्वातंत्रवीर सावरकरांच्या जीवनावरील कादंबरीचे प्रकाशन केले.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी राहुल गांधी यांचे मी आभार मानतो.जेव्हा-जेव्हा सावरकरांचा विसर पडलाय असे वाटते तेव्हा-तेव्हा राहुल गांधी त्यांची आठवण काढून देतात.आपल्याला सावरकरांचे विचार घरोघरी पोहचविण्याची संधी मिळते, असे फडणवीस म्हणाले.सावरकर होण्याची राहुल गांधी यांची औकात नाही, असंही म्हणत फडणवीसांनी टीका केली.ते पुढे म्हणाले, नागपूरकरांना औकात या शब्दाचा अर्थ चांगल्याने माहिती आहे.औकात म्हणजे क्षमता असून सावरकर होण्याची त्यांची क्षमता नाही, असं फडणवीस म्हणाले.