तालिका अध्यक्ष बसलेत ती खुर्ची सुद्धा दोन-तीन लाखांची, मग सरकारच्या डोक्यात भुसा भरलाय का? : बच्चू कडू
1443 views
नागपूर चे व्हिडिओ सबस्क्राईब कराअपक्ष आमदार बच्चू कडू यांनी मंगळवारी विधानसभेत बोलताना सत्ताधाऱ्यांवर परखड शब्दांत हल्लाबोल केला. ते म्हणाले. धनगर समाजात आपण १ लाख लोकांना १ लाख ३६ हजारांचं घर देत आहोत. आज एक भिंत १ लाख ३६ हजारांमध्ये येते का? तालिका अध्यक्ष, तुम्ही ज्या खुर्चीवर बसला आहात, तीसुद्धा २-३ लाखांची आहे. मला एक समजत नाही की सरकारचं डोकं ध्यानावर आहे की नाही? सरकारच्या डोक्यात भुसा भरलाय का? १ लाख ३६ हजारांत घर होतंय का? गुलाबराव(पाटील)? का बोलत नाही तुम्ही?” असा जाब त्यांनी सरकारला जाब विचारला. १ लाख ३६ हजारांत कुणी घर बांधून देत असेल तर मी दाढी-मिशा काढून टाकेन. कुणी असेल तर सांगा मला. तुम्ही बोलत का नाही यावर? शहरांतल्या लोकांना अडीच लाखांचं घर दिलं जातं, पण गावातल्या लोकांना सव्वा लाखांचं घर दिलं जातं. शेतकरी, शेतमजुरांची मतं नको आहेत का तुम्हाला? किती वेळा त्यावर बोलायचं या सभागृहात? भिंती फुटतील, पण तुमच्या डोक्यात कधी येईल? सभासद बोलून बोलून थकले, अशा भावना बच्चू कडूंनी व्यक्त केल्या.