दोन वर्षांच्या खंडानंतर नागपुरात रंगला मारबत उत्सव
nagpur चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
विदर्भातील परंपरागत तान्हा पोळा निमित्त आज जिल्ह्यासह ग्रामीण भागात विविध ठिकाणी मारबत काढण्यात आली. शंभर वर्षाहून अधिक जुनी परंपरा असलेला मारबत उत्सव नागपूरमध्ये जोशपूर्ण वातावरणात साजरा झाला. याप्रसंगी पारंपरिक काळ्या-पिवळ्या मारबतीची मिरवणूक काढण्यात आली. तसेच महागाई, अग्निवीर, भ्रष्टाचार, जीएसटी आदी मुद्द्यांवर निघालेल्या बडग्यांनी जोरदार प्रहार केला. कोव्हिडमुळे दोन वर्षांच्या खंडानंतर झालेला हा मारबत-बडग्या उत्सव नागपूरकरांमध्ये उत्साह दिसला.