बिल गेट्सनंतर आता नागपूरच्या डॉली चायवाल्याला मोदी आणि रजनीकांत यांना चहा पाजण्याची इच्छा
नागपूर चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी एका भारतीय चहा विक्रेत्यासोबतचा व्हिडिओ शेअर केला.नागपुरातील असलेला हा चहा विक्रेता डॉली चायवाला म्हणून फेमस आहे.चहा बनवण्याची खास शैली आणि चव या दोन्ही गोष्टींसाठी देशभरात प्रसिद्ध आहे.व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर डॉली चायवालाच्या स्टॉलवर गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं.ज्यांना चहा पाजला ते बिल गेट्स आहेत हे माहितच नव्हतं असं डॉली चायवाला म्हणाला.शिवाय पंतप्रधान मोदी आणि अभिनेते रजनीकांत यांना चहा पाजण्याची इच्छा डॉली चायवाल्यानं व्यक्त केली.