नागपूर विमानतळावर प्रतिभा धानोरकरांना शोक अनावर; सुनील केदार यांनी हात पुढे करत दिला आधार
नागपूर चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
नागपूर विमानतळावर खासदार बाळू धानोरकर यांचे पार्थिव पोहचले आहे.सुनील केदार आणि विजय वडेट्टीवार यांनी धानोरकरांच्या पार्थिवाचे दर्शन घेतलं. नागपूर विमानतळावर प्रतिभा धानोरकरांना शोक अनावर झाला. प्रतिभा धानोरकरांना अश्रू अनावर झालेत. सुनील केदार यांनी हात पुढे करत प्रतिभा धानोरकरांना आधार दिला. प्रतिभा धानोरकरांना शिवानी वडेट्टीवार यांनीही सावरलं .धानोरकर यांचे पार्थिव निवासस्थानी दर्शनासाठी ठेवलं जाणार आहे. उद्या (३१ मे ) सकाळी 11 वाजता धानोरकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत..