मी अबला नाही, अन्याय झाला की नारी दुर्गेचं रूप घेते; उमेदवारी रद्द, रश्मी बर्वे संतापल्या
नागपूर चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
रामटेक लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला मोठा झटका बसला असून चौकशीअंती जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी रश्मी बर्वेंचा उमेदवारी अर्ज बेकायदेशीर ठरवून रद्द केला. दरम्यान, उमेदवारी रद्द करणं हे राजकीय षडयंत्र असल्याचं सांगून रश्मी बर्वेंनी मोठा संताप व्यक्त केला. राज्य सरकारवर हल्लाबोल करताना रश्मी बर्वे म्हणाल्या की, हे लोक अनुसूचित जातीच्या महिलेला घाबरतात, पण मी अबला नाही, मी सबला, नारीवर अन्याय झाला तर ती दुर्गेचा अवतार धारण करते असा इशाराच रश्मी बर्वेंनी दिला आहेत. दरम्यान, आता रामटेकमधून रश्मी बर्वेंचे पती श्यामकुमार बर्वेंना महाविकास आघाडीने उमेदवारी दिली.