प्रियांका गांधींना निवडणूक आयोगाची नोटीस, विजय वडेट्टीवार भडकले
1649 views
nagpur चे व्हिडिओ सबस्क्राईब कराकाँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांना नोटीस पाठविल्यावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर टीका केली.निवडणूक आयोग भाजपच्या खिशात आहे असा आरोप वडेट्टीवार यांनी केला.निवडणूक आयोग भाजपचे झाले आहे अशा शब्दात वडेट्टीवार यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत.राम मंदिरात मोफत दर्शनाच्या नावाने मत मागणाऱ्यांना नोटीस का देत नाही? असा सवालही वडेट्टीवार यांनी केला आहे.धार्मिक भावनेतून मते मागणे हे संविधानात आहे काय का आचारसंहितेत आहे? असा सवाल त्यांनी निवडणूक आयोगाला केला.कारवाई करायची असेल तर देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्यावर कारवाई केली पाहिजे असं वडेट्टीवार म्हणाले.