नांदेडमध्ये भागवत कराड गो बॅकच्या घोषणा; काळे झेंडे दाखवून सकल मराठा समाजाने दर्शवला निषेध
1045 views
नांदेड चे व्हिडिओ सबस्क्राईब कराकेंद्रीय राज्य मंत्री डॉ. भागवत कराड हे आज (२८ ऑक्टोबर) नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. यावेळी, भागवत कराड गो बॅकच्या घोषणा देत आणि काळे झेंडे दाखवत मराठा आंदोलकांनी निषेध केला. नांदेड शहरातील विभागीय रेल्वे कार्यालयात आयोजित रोजगार मेळाव्याला कराडांनी उपस्थिती लावली. खरतंर हा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवनमध्ये आयोजित करण्यात आला होता. मात्र, आक्रमक मराठा आंदोलकांमुळे विभागीय रेल्वे कार्यालयात हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी, विभागीय रेल्वे कार्यालयाबाहेर मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले. तसेच, भागवत कराड गो बॅकच्या घोषणा देखील देण्यात आल्या.