नांदेडमध्ये तब्बल १११ एकर जमिनीवर होणार मनोज जरांगे पाटलांची उत्तर सभा, मराठा बांधवांकडून तयारी जोरात
1160 views
नांदेड चे व्हिडिओ सबस्क्राईब करामराठा आरक्षणासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून मैदानात उतरलेल्या मनोज जरांगे पाटलांची डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात नांदेडमध्ये सभा होणार आहे. शहरापासून जवळच असलेल्या जिजाऊ नगरवाडी पाटी येथे होणाऱ्या या सभेची तयारी मराठा बांधवांकडून जोरात सुरु आहे. विशेष म्हणजे १११ एकर जमिनीवर मनोज जरांगे पाटलांची ही भव्य सभा पार पडणार आहे. नांदेडमधील ही सर्वात मोठी सभा असणार असल्याचं सखल मराठा समाजातर्फे सांगण्यात येत आहे. रविवारी (२६ नोव्हेंबर) सभेच्या ठिकाणाच्या मैदानावर सभास्थळाचं भूमिपूजन करण्यात आलं. यावेळी एकूण ३३ जेसीबी, १६ ट्रॅक्टरच्या मदतीने मैदान तयारीला सुरुवात झाली आहे.५ लाखांहून अधिक मराठा बांधव या सभेला उपस्थित राहणार असल्याचा दावाही करण्यात आला आहे. विरोधकांकडून होणाऱ्या टीकांच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटलांची ही सभा म्हणजे उत्तर सभा असेल असं सखल मराठा समाजाचे समन्वयक श्याम पाटील वडजेंनी सांगितलं आहे.