सबको सन्मती दे भगवान; नांदेडमध्ये अशोक चव्हाणांच्या बॅनरची चर्चा, पक्षचिन्ह गायब
1071 views
नांदेड चे व्हिडिओ सबस्क्राईब कराअयोध्येत होणाऱ्या श्रीराम मंदिराच्या प्रतिष्ठापनेचे नांदेड शहरात अनेक बॅनर लागले आहेत. नांदेडमधील काँग्रेस नेते अशोक चव्हाणांच्या नावानेही एक बॅनर लावण्यात आला आहे. ईश्वर अल्लाह तेरो नाम, सबको सन्मती दे भगवान; अशा ओळी या बॅनरवर पाहायला मिळत आहेत. मात्र, या बॅनरवर फक्त अशोक चव्हाणांचं नाव असून पक्षाचं नाव आणि चिन्ह दिसत नसल्याने नांदेडमध्ये सध्या वेगळ्याच चर्चांना उधाण आलं आहे.