नांदेडमध्ये अवकाळी पावसाचा कहर सुरूच आहे.मागील आठ ते दहा दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पावसाचा जोर वाढतोय. अर्धापुर तालुक्यात गुरुवारी रात्रभर पडलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. पावसामुळे अर्धापुर तालुक्यातील नदी नाले तुडुंब भरून वाहतायत. काही ओढ्यांना पूर आला असल्यानं शहरात जागोजागी तळे साचलेत. ऐन उन्हाळ्यात पूरसदृश्य परिस्थिती पाहायला मिळतेय. पावसाच्या हाहाकारामुळे अख्खं गावच पाण्यात आहे. पावसामुळे शेतीच आणि केळी बागांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय.
nandedTimesXP MarathiUpdated: 5 May 2023, 11:51 am