तीन वेळेस अपयश, पठ्ठ्यानं माघार घेतली नाही, अखेर यश मिळवलंच, यूपीएससी परीक्षेत बाजी
1061 views
नंदुरबार चे व्हिडिओ सबस्क्राईब कराअपयश हि यशाची पहिली पायरी असत. पण अपयशाला खचून न जाता पुढे जाण्याला खऱी जिद्द असते. २५ व्या वर्षीय जैनम जैन यानंही तेच केलं. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आपले धेय गाठलेच.नंदुरबारमध्ये राहणाऱ्या जैनम महेंद्रकुमार जैन यानं वयाच्या २५ व्या वर्षी upsc क्रॅक केली आहे. जैनमला तीन वेळा अपयश आलं पण ते पण त्यानं हार न मानता चौथ्या वेळेस प्रयत्न केला आणि यश मिळवलचं. जैनम जैन हा शहरातील ड्रायफ्रुट व्यावसायिक महेंद्रकुमार व मंजूदेवी जैन यांचा मुलगा आहे. त्याचे १२ वी पर्यंतचे शिक्षण नंदुरबार शहरातील चावरा स्कूल येथे झाले आहे तर पुणे येथील फर्ग्यूसन महाविद्यालयातून संख्याशास्त्र विषयातून पदवी पूर्ण केली आहे. जैनम देशातून १०३ व्या रँकने युपीएससीमध्ये उत्तीर्ण झाला आहे.