सीझर झालं आणि दोन जुळ्या मुलांना जन्म देऊन आई गेली, मदतीला येणारी रुग्णवाहिकाही अडकली
3614 views
नंदुरबार चे व्हिडिओ सबस्क्राईब करानंदुरबारमध्ये कुपोषण आणि बालमृत्यूची समस्या गंभीर झाली आहे. राज्यात कुपोषित बालकांची संख्या २८ हजार असून त्यापैकी २३ हजार बालके एकट्या नंदुरबार जिल्ह्यातील असल्याचं समोर आलं आहे. कुपोषणाबरोबरच बालकांच्या मृत्यूच्या प्रमाणातही वाढ झाल्याचे समोर आले आहे. कुठे गर्भवती मातांचा जीव जातोय, तर कुठे जीवंत असलेली मुलं कुपोषित होतायत.. सरकारी अनास्था कशाला म्हणतात ते नंदुरबारच्या आरोग्य व्यवस्थेवर नजर टाकल्यावर आपल्या लक्षात येईल...