समृद्धी महामार्गावर मोठी दुर्घटना; काम पूर्ण होण्याआधीच पूल कोसळला
1227 views
नाशिक चे व्हिडिओ सबस्क्राईब करामहाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून गाजावाजा करत तयार करण्यात आलेल्या समृद्धी महामार्गाबद्दल धक्कादायक बातमी समोर आली आहे. नाशिकमध्ये इगजपुरीजवळ समृद्धी महामार्गावरील निर्माणाधीन पूल कोसळला आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाला नाही. पण, या घटनेमुळे महामार्गाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थितीत झाले आहे.इगतपुरी तालुक्यातील बेलगाव तरहाळे ते गांगडवाडी दरम्यान हा पुल कोसळला आहे. पुलाचं काम सुरू असताना अचानक हा पूल कोसळला. इगतपुरी तालुक्यातील गावाच्या मुख्य रस्त्यावर असलेला पूल कोसळल्याने काही काळासाठी परिसरामध्ये घबराहटीचे वातावरण निर्माण झाले होते.भला मोठा आवाज झाल्यामुळे एकच गोंधळ उडाला होता. सुदैवाने या ठिकाणी कोणतीही गर्दी नव्हती, त्यामुळे या दुर्घटनेत कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, पुलाच्या कामाचं ऑडिट करण्याची स्थानिक ग्रामस्थांची मागणी केली आहे.