पाया पडली, हात जोडले, किंकाळी फोडली; अंगणवाडी सेविकेचा CM शिंदेंसमोर टाहो
नाशिक चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक जिल्हा दौऱ्यावर होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी १२ जानेवारीला नाशिक जिल्हा दौऱ्यावर आहेत.सभास्थळी पाहणी करण्यासाठी सोमवारी सायंकाळी तपोवन येथील मैदानावर आले होते.मुखमंत्र्यांचा ताफा सभास्थली पोहचताच अंगणवाडी सेविका अन्नपूर्णा अडसुले यांनी...चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पायावर लोळण घेतल्याने काही काळ गोंधळ निर्माण झाला.अंगणवाडी सेविका गेल्या दोन महिन्यांपासून संपावर असून त्यांचा संताप अनावर झाला आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभास्थळी येणार असल्याने येथे काही आंदोलक आले होते.मात्र पोलिसांना आणि मुख्यमंत्री शिंदेंच्या सुरक्षा कवचाला भेदून ही महिला थेट ताफ्यात शिरली.त्यामुळे काही काळ पोलिस आणि पदाधिकारी गोंधळले. दोन ते तीन मिनिटे हा गोंधळ सुरू होता.त्यांनतर महिला पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतले.