भाजपनं निवडून दिलं पण हेमंत गोडसे भाजपचं एक काम करत नाही, भाजप नेत्याचा आरोप
1058 views
नाशिक चे व्हिडिओ सबस्क्राईब करानाशिकच्या लोकसभा जागेवरून महायुतीकडून शिंदेंच्या शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार शिमगा रंगला आहे. रविवारी खासदार हेमंत गोडसे नाशिकहून शेकडो वाहनांचा ताफा घेऊन मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचले.हेमंत गोडसे समर्थकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी ठिय्या आंदोलन केले. नाशिकची जागा भाजपचीच असल्याचं दिनकर पाटील यांनी सांगितलं.हेमंत गोडसे काम करत नसल्याचा आरोपही दिनकर पाटलांनी केला.