शाहरुख खानच्या चाहत्यांचा कहर; जवान चित्रपटाच्या शो दरम्यान चक्क थिएटरमध्ये फोडले सुतळी बॉम्ब
1279 views
नाशिक चे व्हिडिओ सबस्क्राईब कराबॉलिवूडचा किंग शाहरुख खानच्या जवान चित्रपटाच्या मालेगावातील शेवटच्या शोमध्ये मोठा गोंधळ झाला. शाहरुखच्या अति उत्साही चाहत्यांनी मालेगावातील कमलदीप थिएटरमध्ये चक्क फटाके फोडले. थिएटरमध्ये सुतळी बॉम्ब फोडत चाहत्यांनी साजरा केलेला हा आनंद खरंतर अत्यंत धोकादायक प्रकार आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी काही युवकांना ताब्यात घेतलं असून रमजान पुरा पोलीस स्थानकात संबंधितांवर कार्यवाही सुरु असल्याची माहितीही मिळत आहे.