'मला एकट्याला टार्गेट केलं जातंय', मनोज जरांगे यांच्या टीकेवर छगन भुजबळ यांचं प्रत्युत्तर
6223 views
nashik चे व्हिडिओ सबस्क्राईब करामराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी मराठवाड्यातील आठ जिल्ह्यातील दौरे सुरू केले आहे. यावेळी दौऱ्यावर असलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळांवर निशाणा साधला आहे. मराठ्यांनी भुजबळांना बळ द्यायचं काम करू नये, असं आवाहन जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केलं आहे. यावर आता मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांना प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले, इशारे मला द्यायचे असतील तर जरुर द्या, पण हे माझ्या एकट्याचं मत आहे का? मराठ्यांना ओबीसींमधून आरक्षण न द्यावं ही माझं नाही तर सगळ्यांचं मत आहे, असंही ते म्हणाले. गेले ३५ वर्ष मागासवर्गीयांसाठी लढणं हा माझ्या जीवनाचा भाग आहे. पण मला यात एकट्याला टार्गेट केलं जातंय असंही यावेळी छगन भुजबळ जरांगे पाटील यांना म्हणाले.