लग्न ठाकरेंच्या आमदाराच्या मुलाचं अन् घोषणाबाजी एकनाथ शिंदेंच्या नावाने, निकालानंतर काहीच
1186 views
नाशिक चे व्हिडिओ सबस्क्राईब करासर्वोच्च न्यायालयाने आज (११ मे) महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर निकाल दिला अन् शिंदे-फडणवीसांना दिलासा मिळाला. न्यायालयाने कितीही ताशेरे ओढले असले तरी एकनाथ शिंदेंच पद आणि हे सरकार स्थिर असल्याचं हे स्पष्ट झालं आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर अवघ्या काही तासांत शिंदेंनी ठाकरेंच्या आमदाराला दिलेला शब्द पाळला. ठाकरेंचे आमदार किशोर दराडेंच्या मुलाच्या लग्नात शिंदेंनी उपस्थिती लावली अन् शिंदेंच्या समर्थनार्थ घोषणाबाजीही दिसली. किशोर दराडेंच्या मुलाच्या लग्नासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गिरीश महाजन नाशिकमध्ये आले होते.