अजित पवारांच्या ताफ्याला काळे झेंडे, नाशकात रस्त्यावर टोमॅटो-कांदे फेकून शेतकऱ्यांचं आक्रमक आंदोलन
नाशिक चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
नाशिक दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांना आज (७ ऑक्टोबर) शेतकऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. वणीमध्ये संतप्त शेतकऱ्यांनी रस्त्यावर टोमॅटो आणि कांदे फेकून आंदोलन केलं, इतकंच नव्हे तर अजितदादांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवत आपला निषेध व्यक्त केला आहे.अजितदादा कळवणकडे जात असताना वणीमध्ये शेतकऱ्यांनी आपला हा निषेध व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, या प्रकारामुळे पोलिसांकडून शेतकऱ्यांची धरपकड करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.